महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । सध्याच्या वातावरणात ज्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे ते चुकीचे आहे. शहरातून, गावातून ज्यावेळी शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले जातात त्यानंतरच आपली खरी जबाबदारी वाढते असे मत अभिनेते (Actor) नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी पुण्यात व्यक्त केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या राजकारणावर बोलत असताना त्यांनी चित्रपटगृहांना लावलेल्या निर्बंधावरही त्यांनी मत व्यक्त करुन कोरोनाचे (Corona) निर्बंध लावायला सरकारला आनंद होतोय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.