एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । नवी दिल्ली एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकवर पूर्ण बंदी आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिक पॅकेजिंगबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी रात्री उशिरा ट्विटरद्वारे नवीन ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (दुरुस्ती), नियम २०२२’ अधिसूचित केला. नवी मार्गदर्शक तत्त्वे प्लास्टिकच्या पर्यायांना चालना देतील, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकेरी वापराच्या प्लास्टिकचे पूर्णपणे उच्चाटन करण्याच्या आवाहनांतर्गत पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिक पॅकेजिंगसाठी ‘विस्तारित उत्पादक जबाबदारी’बाबत (ईपीआर) सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.’ही मार्गदर्शक तत्त्वेकेवळ प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्यासंबंधीची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मापदंड प्रदान करणार नाहीत, तर प्लास्टिकचे नवे पर्याय विकसित करण्यासाठीही अनुकूल आहेत. यामुळे व्यवसायांना टिकावून प्लास्टिक पॅकेजिंगच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल,’ असे ट्वीट यादव यांनी केले आहे. ‘उत्पादक, आयातदार आणि ब्रँडमालकांना ऑनलाइन पोर्टलवर वार्षिक कर विवरण भरताना पुढील आर्थिक वर्षाच्या ३० जूनपर्यंत नोंदणीकृत प्लास्टिक पुनर्वापरकर्त्यांकडून पुनर्वापराच्या प्रमाणपत्रांची माहिती सादर करावी लागेल,’ असे नवीन नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘ईपीआर’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयाला उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली आहे. … चार श्रेणींमध्ये विभागणी नव्या नियामांनुसार प्लास्टिकची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत घन प्लास्टिक, दुसऱ्या श्रेणीत एक किंवा अनेक स्तर असलेले लवचिक प्लास्टिक, प्लास्टिक शीट आणि प्लास्टिक शीटचे कव्हर, कॅरी बॅग, प्लास्टिक सॅशे किंवा पाऊचचे लवचिक प्लास्टिक; तिसऱ्या श्रेणीत बहुस्तरीय प्लास्टिक पॅकेजिंग (प्लास्टिकचा किमान एक थर आणि प्लास्टिकव्यतिरिक्त किमान एक थर);तर प्लास्टिक शीट किंवा पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या, तसेच कम्पोस्टेबल प्लास्टिकपासून बनवलेल्या कॅरी बॅग चौथ्या श्रेणीत येतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वे तत्काळ प्रभावाने लागू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *