Jammu Kashmir : शोपियानमध्ये मोठी चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. ही चकमक शोपियानच्या झैनापोरा भागातील चेरमार्ग येथे झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला आहे. या परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. (One terrorist killed in an encounter at Chermarg, Zainapora area of Shopian)

या परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येतेय. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने याठिकाणी शोध मोहीम सुरू केली. जवानांचं पथक संशयित ठिकाणांकडे जात असताना तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला.

दरम्यान, शुक्रवारी श्रीनगरमधील नौहट्टा भागातील ख्वाजा बाजारमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. रस्त्यावर फेकण्यात आलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात परिसरातल्या तीन दुकानांच्या काचा फुटल्या आणि एका रिक्षाचंही नुकसान झालं होतं. हल्ल्यानंतर लगेचच पोलीस आणि सुरक्षा दलांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *