पुणे बंद : महत्त्वाच्या कारणासाठी घराबाहेर पडायचंय? पोलिस देत आहेत पास!

Spread the love

महाराष्ट्र २४-ऑनलाईन ; – पुणे : संचारबंदीच्या काळात महत्त्वाच्या कामाबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये, पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या महत्त्वाच्या कारणासाठी डिजीटल पास/डिजीटल परवानगीचा क्युआर कोड देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी संबंधित नागरिकांच्या मोबाईलवर पाठविलेला क्युआर कोड तपासणी करणाऱ्या पोलिसांना दाखविल्यानंतर नागरिकांना त्यांचे काम करणे सोईचे ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने व्हॉट्सअप सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यास 17 हजारहून अधिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधत आपल्या समस्या सोडविल्या होत्या.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या महत्त्वाच्या कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी डिजीटल पास/परवानगीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार, नागरिकांनी डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी www.punepolice.in वर आपली तपशील माहिती कळवावी. संबंधीत अर्ज मंजूर झाल्यानंतर पोलिस नागरीकास क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठवतील.
त्यानुसार, घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस त्यांना दाखवायचा आहे. संबंधित पोलिस अधिकारी/कर्मचारी त्यांच्याकडील मोबाईल अॅपमध्ये क्युआर कोडची तपासणी करतील. त्यानंतर नागरिकांना आपल्या कामांसाठी पुढे जाता येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराले यांनी सांगितले.
आयटी कंपन्याच्या कर्मचाऱ्यांना “वर्क फ्रॉम होम”साठी लागणाऱ्या कॉम्प्युटर डेस्कटॉपच्या वाहतुकीसाठी देखील या माध्यमातून परवानगी मिळेल. त्यादृष्टीने त्यांनी त्यांना प्राप्त झालेला क्यूआर कोड तपासणी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दाखवावा, त्याची पडताळणी झाल्यानंतर त्यांना पुढे जाता येईल, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराले यांनी स्पष्ट केले.

डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी इथे भरा माहिती :
– www.punepolice.in
– अर्ज मंजूर झाल्यास आपणास मिळेल एक क्यूआर कोड (QR Code)
– या क्युआर कोडचा एक एसएमएस तुमच्या मोबाईलवर येईल.
– पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस/क्युआर कोड दाखवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *