आता हापूस आंबे आणि मासे राज्यभरात उपलब्ध होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४-ऑनलाईन ; मुंबई – कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा नागरिकांना आता हापूस आंबे आणि मासे राज्यभरात उपलब्ध होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गुढीपाडव्यापासून हापूसचा हंगाम सुरु होतो. पण लॉकडाऊनमुळे हापूस आणण्यात अडचणी होत्या.
राज्य सरकारनं याची दखल घेऊन आंबा आणि मासे वाहतुकीला अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले.

कोकणातील आंबे राज्याच्या कोणत्याही भागात विक्रीसाठी पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुंबईसह महाराष्ट्रात हापूस उपलब्ध होऊ शकेल आणि लोकांना घरबसल्या हापूसची चव चाखता येईल. पुण्यातील भाजी, फळं आणि मासळीबाजार आज किंवा उद्या सकाळपासून सुरु होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राज्य सरकारनं मासे विक्रीलाही परवानगी दिली आहे. राज्यात कुठल्याही बाजारात मासे विक्री केली जाऊ शकते, त्यात अडचण येणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *