पुणे : भाजीपाल्याचे भाव किलो मागे १०-२० रूपयांनी कमी झाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४-ऑनलाईन ; पुणे – उपनगरात शुक्रवारी मुबलक भाजीपाला उपलब्ध झाला. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव किलो मागे १०-२० रूपयांनी कमी झाले आहेत. मागील चार दिवसांपासून मार्केट यार्ड बंद असल्याने शहरात सगळीकडे भाज्यांचा तुटवडा आणि दर गगनाला भिडले होते. परंतु शुक्रवारी शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे मार्केट यार्ड बंद होते. त्यामुळे शहरात भाजीपाला, किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागला होता. परंतु गुरुवार पासून गुळ-भुसार विभाग सुरू झाला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शहरात भाजीपाला विक्रीसाठी आणला. शहरातील विविध भातील किरकोळ विक्रेत्यांना हा भाजीपाला शेतकऱ्यांनी त्यांच्या विक्रीच्या ठिकाणी पोहच केला. त्यामुळे शहरात सर्वत्र भाजीपाला उपलब्ध झाला.

कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले होते. परंतु राज्य शासनाने शेत मालाच्या वाहतुकीला परवानगी दिल्याने शुक्रवारी शहरात भाजीपाला उपलब्ध झाला.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
भाज्या दर
हिरवी मिरची 180
शेवगा 100
गवार 80
वांगी 80
दोडका 60
कोबी 60
कांदा 50
बटाटा 60
लसूण 200

पालेभाज्यांचे गड्डीचे दर
कोथिंबीर 20
मुळा 30
मेथी 30
कांदापात 30
अंबाडी 30
चाकवत 30

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *