वसई-विरार बर्ड फ्लूचा धोका कायम, 3 दिवसांत 31 हजार कोंबड्या नष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । बर्डफ्लूमुळे शहापूर आणि वसई-विरारमध्ये तीन दिवसांत ३१ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या.अर्नाळ्यातही शुक्रवार आणि शनिवारी पाच विशेष पथकांनी सर्च ऑपरेशनद्वारे ७ हजार कोंबड्या मारल्या. दोन पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या जागेत आणि पुरापाडा इथल्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेत जेसीबीच्या साह्याने खड्डा करून कोंबड्या पुरण्यात आल्या.

बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास आणि वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बंदी घातलीय. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे वेधशाळेत पाठवलेले त्यांनी साथीच्या तापाने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.

अर्नाळ्याच्या दासपाडा परिसरातील बॅरी बरबोज यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत होत असल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने पुणे वेधशाळेत पाठवले. त्यांनी साथीच्या तापाने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.

यानंतर भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असता बर्ड फ्लूमूळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या नंतर पाच पथकांनी बर्ड फ्लूची लागण झालेल्या पोल्ट्रीतील १२०० ते १३०० कोंबड्या त्यांच्याच जागेत पुरल्या.

नंतर एक किलोमीटर परिसरातील घरी पाळलेल्या २०० कोंबड्यांची डम्पिंग ग्राउंडवर खड्डा खणून विल्हेवाट लावल्याचे अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकज संख्ये यांनी सांगितले. शनिवारी आलेल्या पथकाने डॉ. बाटलीकर यांच्या जागेत त्यांच्या पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार कोंबड्या पुरल्याचेही त्यांनी सांगितले.न दळवी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *