![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । सध्या उत्तर भारतात तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तर भारतात नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडमध्ये पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे किमान तापमानात घट होणाार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखल किमान तापमानात वाढ होत आहे. तापमानाचा पारा 30 ते 35 अंशावर गेला आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात हळूहळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवस आणि रात्रीतील तापमानात तफावत जाणवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसात राज्यात तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दिल्ली
राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज तापमानात पूर्वीच्या तुलनेत वाढ होणार असली तरी यासोबतच थंड वारेही वाहत असल्याचे दिसून येत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस दिल्लीत असेच वातावरण पाहायला मिळणार आहे.