दिशा सालियान मृत्यूप्रकरण अन् सचिन वाझेचं कनेक्शन? नितेश राणेंचं खळबळजनक ट्विट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणावरून (Disha Salian Death Case) नारायण राणेंनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा मुद्दा परत एकदा चर्चेत आला. याबाबत मुंबईच्या महापौरांनी (Mumbai Mayor) राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळीच ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. दिशा सालियान मृत्यूप्रकरण आणि सचिन वाझेचं कनेक्शन आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

दिशा सालियानप्रकरणात मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद दिसतेय. आता त्यांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ जूनच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहत असलेला रोहन रॉय सर्वांसमोर येऊन का बोलत नाही? दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आले ती कार वाझेची आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यावरून देखील नितेश राणे यांनी टीका केली आहे. मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर आयोगानं मालवणी पोलिसांनी अहवाल सादर करण्यास सांगितला. यावरून ८ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, असं करून ते स्वतःसाठीच खड्डा तयार करत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *