Haris Rauf, PSL 2022; खेळात ‘असभ्य’ वर्तन; पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफने सहकाऱ्याला भर मैदानात मारले,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, हे म्हटले जाते. पण, या खेळात असभ्य वर्तन पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League ) झालेले पाहायला मिळाले. लाहोर कलंदर्स व पेशावर जाल्मी यांच्यातल्या सामन्यात हा प्रसंग घडला. पेशावर संघाने सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला. पण, या सामन्यात लाहोर कंदर्स व पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ ( Harish Rauf) याने सहकारी कामरान घुलाम ( Kamran Ghulam) याच्या कानखाली लगावली.

घुलाम याने पेशावरच्या हझरतुल्लाह जझाई याचा झेल सोडला, हॅरिस रौफ गोलंदाजीला होता. त्याच षटकात फवाद अहमदने सुरेख झेल घेत मोहम्मद हॅरिसला माघारी पाठवले. सर्व सहकारी या विकेटचा आनंद हॅरिस रौफसह साजरा करत असताना घुलामही गोलंदाजाजवळा आला. त्यानंतर संतापलेल्या रौफने त्याच्या कानाखाली लागवली.

त्यानंतरही घुलाम हसत होता आणि रौफ त्याच्याकडे रागाने पाहत होता. १७व्या षटकात घुलामने क्षेत्ररक्षणात चपळता दाखवताना पेशावरचा कर्णधार वाहब रियाझला रन आऊट केले. तेव्हा रौफ त्याच्या जवळ आला आणि घुलामला मिठी मारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *