Lamborghini Huracans: चार हजारांहून अधिक लॅम्बोर्गिनी हुराकन्स गाड्या परत मागवल्या, कारण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । लॅम्बोर्गिनी हुराकन्स गाड्या परत मागवल्याने कारप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. चार हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या परत मागवण्याची कंपनीची पहिलीच वेळ आहे. मात्र आता त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. गेल्या वर्षी लॅम्बोर्गिनीने ४,७९६ हुराकन्स गाड्या हेडलाइट ऍडजस्टमेंट स्क्रूवर कॅप न ठेवता वितरित केल्या होत्या. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने (NHTSA)नुकत्याच केलेल्या घोषणेमध्ये सांगितलं आहे की, या सर्व गाड्या कॅप बसवण्यासाठी परत मागवण्याच्या अधीन आहेत. दुसरीकडे, कंपनी या मॉडेल्सच्या मालकांना नविन पार्ट मोफत बसवून देणार आहे.

२०२० या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या नियमित अंतर्गत ऑडिटमध्ये ही बाब समोर आली होती. तेव्हा ही एक मानवी चूक असल्याचं कारण पुढे आलं होतं. लॅम्बोर्गिनीने अधिकृतपणे हेडलाइटच्या क्षैतिज समायोजन स्क्रूवर ब्लँकिंग कॅप्स नसल्याची पुष्टी केली. त्याचबरोबर फेडरल सेफ्टी स्टँडर्डचे पालन करत नाही. कंपनीने मार्च २०२० मध्ये या समस्येबाबत एजन्सीला सूचित केले आणि त्यानंतर याचिका सादर केली. मात्र नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने याचिका फेटाळून लावल्याने कंपनीने ब्लँकिंग कॅप्सशिवाय असलेली मॉडेल्स परत मागवली होती. एजन्सीने या एका चुकीमुळे वाहनचालकासाठी सम्स्या निर्माण होऊ शकतो असं सांगितलं होतं. दृश्यमानतेच्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे गंभीर अपघात देखील होऊ शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *