कोरोनामुळे ‘गोकूळ’ च्या अडचणीत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ;कोल्हापूर : कोरोनाचा फटका देशात संघटीत, असंघटीत अशा सर्वच क्षेत्राला बसला आहे. काहीजणांकडे घरुन काम करण्याचा पर्याय असला तरी हातावर पोट असलेले अनेकजण शहरांतून स्थलांतराच्या प्रयत्नांत आहेत. रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे दुग्ध व्यवसायाला याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय.

संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर बंदी आली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीला सुट दिली आहे. तरीही दुकाने बंद असल्याने या मालाची नेआण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाची भीती आणि पोलिसांच्या धाकाला घाबरुन अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. मालाची नेआण करण्यास माणसं नसल्याची परिस्थिती अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान गोकूळ दुध उत्पादक कंपनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर दुधाची मागणी घटल्याचे समोर आले आहे. तसेच दुधाच्या उपपदार्थांची ही मागणी देखील कमी झाली आहे. गोकुळची विक्री फक्त 7 लाखांवर आली आहे. यामुळे दूध संघासमोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. म्हणून रोज पाच लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय गोकूळ व्यवस्थापनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *