महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेलाही एक झटका बसला असून श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली असून अजून तो पूर्णपणे ठिक झाला नसल्याने तो तिन्ही टी20 सामन्यांना मुकणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्या उद्या लखनौ येथे पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. याआधी हसरंगाबाबत माहिती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून (SLC) कळवण्यात आले की,”वानिंदु हसरंगा याला कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (22 फेब्रुवारी) त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली असता त्या रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे.” दरम्यान श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी