IPL 2022 Schedule : आयपीएलची फायनल मे महिन्यात, मुंबईत होणार 55 सामने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचं वेळापत्रक जवळपास निश्चित झालं आहे. यंदाच्या आयपीएल सिझनला 26 मार्चपासून सुरूवात होणार असून 29 मे रोजी फायनल होऊ शकते. यंदाच्या स्पर्धेत 10 टीम उतरणार आहेत. आयपीएल ऑक्शनमध्ये एकूण 204 खेळाडूंची खरेदी झाली आहे. त्यापूर्वी 33 खेळाडू रिटेन झाले आहे. आता एकूण 237 खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आज (24 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. या बैठकीत वेळापत्रकावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

‘क्रिकबझ’नं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल स्पर्धेच्या लीग राऊंडमधील मॅच महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील या स्टेडियमवर 55 मॅच होतील. तर पुण्यातील स्टेडिअममध्ये 15 सामने होणार आहेत. सर्व 10 टीम वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअमवर 4-4 सामने खेळेल. तर पुण्यात आणि ब्रेबॉनमध्ये 3-3 मॅच होतील. आगामी आयपीएल सिझनमध्ये एकूण मॅचची संख्या 60 च्या ऐवजी 74 झाली आहे.

आयपीएल ‘प्ले ऑफ’ मधील 4 सामने कुठे होणार हे अद्याप निश्चित झाले नाही. हे सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी आयपीएल सिझनमध्ये 10 देशांचे खेळाडू उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) स्पर्धेची विद्यमान चॅम्पियन असून मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) सर्वाधिक 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

अहमदाबाद आणि लखनऊ या दोन शहरांच्या टीम पहिल्यांदाच आगामी सिझनमध्ये आयपीएलमध्ये खेळतील. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यात खेळणार नाहीत. ऑस्ट्रेलियन टीम त्या काळात पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सीरिज खेळणार आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) चा सिझन कोरोनामुळे प्रभावित झाला होता. आयपीएलचा पहिला राऊंड भारतात तर दुसरा राऊंड युएईमध्ये पार पडला, तर आयपीएल 2020 चं संपूर्ण आयोजन युएईमध्येच झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *