हिऱ्यांची चमक सोन्याहून अधिक: 52 हजारांहून 75 हजार रुपये ; हे आहे दरवाढीमागे कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे जग हादरलेले असताना हिऱ्यांच्या किमतीतही अचानक धक्कादायक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात हिऱ्याची कॅरेटची किंमत ५२ हजारांहून थेट ७५ हजाराच्या घरात गेली. या दरवाढीमागे इंग्लंडमधील मक्तेदार कंपनीचा मोठा हात आहे. जळगावात सोन्याबरोबरच हिऱ्यांच्या दागिन्यांचाही बाजारपेठ आहे. सध्या वार्षिक ७० कोटींपर्यंत असलेले हे मार्केट सतत वाढत चालले आहे. त्यामुळे हिऱ्यांच्या दराकडेही इथल्या बाजारपेठेचे लक्ष असते. कॅरेटमागे तब्बल ५० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात ही वाढ असून पहिल्यांदाच इतकी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘डी बिअर्स’ ही जागतिक पातळीवर हिऱ्यांचे खणन आणि व्यापार करणारी इंग्लंडची कंपनी असून ३५ देशात ती व्यवसाय करते. कोरोना काळात मंदी आणि लाॅकडाऊनमुळे कंपनीला मोठा फटका बसला. त्याची भरपाई करण्याच्या हेतूने कंपनीने अचानक ५० टक्क्यांनी दर वाढवले आहेत. दरम्यान, डी बिअर्सने सिंडीकेट करून दर वाढवले असून या भरमसाठ दरवाढीचा जळगावच्या हिरे व्यवसायावर मोठा परिणाम जाणवू शकतो, असे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *