महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । टीम इंडियामधील एक असा क्रिकेटर आहे, ज्याने टीममध्ये येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कापला खेळ देखवला. परंतु असे असुनही निवडकर्त्यांनी मात्र या खेळाडूकडे लक्ष न देता त्याला टीम इंडियापासून लांब केलं आहे. सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यामुळे त्यांची मते लक्षात घेऊन निवड समिती खेळाडूंची निवड करते.
परंतु रोहीच्या कारकिर्दीत इंडियन टीमच्या एका खेळाडूवरती मात्र अन्याय झाला आहे. कारण या खेळाडूला टीमपासून लांब राहावे लागत असल्यामुळे लवकरच त्याचे करिअर धोक्यात आहेत.
टीम इंडियाचा ‘यॉर्कर मॅन’ म्हणून ओळखले जाणारा टी नटराजन (T Natarajan) जवळपास वर्षभरापासून टीम इंडियातून बाहेर आहे. हा गोलंदाज श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासारखे प्राणघातक यॉर्कर चेंडू टाकतो, ज्यामुळे टीमला विरोधी संघातील मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळते.
परंतु निवडकर्त्यांनी या खेळाडूला टीम इंडियातून बाहेर ठेवले आहे. टी. नटराजन शेवटचा मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसला होता. या मालिकेनंतर टी. नटराजनला निवड समितीने विचारात घेतलं नाही.