महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । सोनं आणि चांदीच्या (Gold-silver rate) दरात आज घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सोन्याचे भाव वाढले होते. पण शुक्रवारी 25 फेब्रुवारीच्या सकाळी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. IBJA च्या वेबसाइटनुसार, काल संध्याकाळच्या तुलनेत आजच्या व्यवहारात सोने 1672 रुपयांनी स्वस्त झाले आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आज चांदी 2984 रुपयांनी स्वस्त झाली. आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,868 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. चांदीचा भाव आज प्रतिकिलो 65,165 रुपये आहे. (Gold Rate Today)
गुरुवारी सोन्याचा भाव 1,656 रुपयांनी वाढून 51,627 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. चांदीचा भावही 2,350 रुपयांनी वाढून 66,267 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 109 पैशांनी घसरून 75.70 वर बंद झाला. काल आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,942 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 25.07 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. बुधवारी दिल्लीत सोन्याचा भाव 126 रुपयांनी घसरून 49,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1892.2 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
कॅरेटनुसार आज सोन्याचा भाव किती होता (Gold Rate)
24 कॅरेट – 50868
22 कॅरेट – 46595