युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद ; सुर्यफूल तेलाची कमतरता भासण्याची शक्यता, कंपन्यांकडूनही विक्री बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २७ फेब्रुवारी । युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन खाद्यतेलाचे दर वाढण्यास झाली आहे. गुरुवारी दिवसभरात सूर्यफूल तेल दरात तेरा रुपयांपर्यंतची वाढ झाली. युक्रेनहून येणारी सूर्यफुल तेलाची आयात बंद झाल्यानंतर आता कंपन्यांकडूनही या तेलांची विक्री थांबविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सूर्यफुल तेलाची कमतरता जाणवू शकते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

युक्रेन-रशिया युद्धामुळे गुरुवारी (दि. २४) सकाळी १६२ रुपये किलो असलेले सूर्यफुल तेलाचे दर सायंकळी दहा रुपयांनी वाढून १७२ रुपये प्रतिकिलो झाले. सोयाबीन तेलाचेही दर १४७ वरून १६० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी (दि. २५) दरांत वाढ होण्याची शक्यता असतांनाच दर स्थिर राहिले. मात्र, सूर्यफुल तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून तेलाचा विक्री थांबविण्यात आली आहे. नाशिकला दररोज तीन ते चार टँकर खाद्यतेल उपलब्ध होत असते. दर दररोज पंधरा किलोचे अडीच हजार डब्यांची विक्री होते. परंतु, आता केवळ दिवसाकाठी केवळ एकच टँकर उपलब्ध झाला आहे.

युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे गुरुवारी खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाली होती. शुक्रवारी (दि. २५) मात्र, खाद्यतेलांचे दर स्थिर होते. तेल उत्पादक कंपन्यांनी सूर्यफुल तेलाची विक्री बंद केल्याने येत्या काही दिवसांत या तेलाची कमतरता जाणवू शकते. शहरात सध्या मागणीच्या तुलनेत निम्माच साठा उपलब्ध होत आहे.

– प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष,

नाशिक किराणा व्यापारी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *