महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जगाच्या अर्थकारणालाही , रशिया-युक्रेन युद्धाचा फटका; बीअरच्या किमती वाढण्याची शक्यता, ऐन मोसमात बीअर कंपन्यांसमोरील अडचणीत वाढ.
बीअर उत्पादनात बार्ली हा महत्त्वाचा घटक , युक्रेनमध्ये बार्लीचे सर्वाधिक उत्पादन होते. युद्धामुळे बार्लीच्या पुरवठ्यावर परिणाम होणार बार्लीच्या तुटवड्यामुळे बीअर उत्पादनावर परिणाम होणार आहे.त्यामुळे बीअरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे , त्यामुळे ऐन मोसमात बीअरचे दर वाढणार आहेत.
बीअरच्या दरात वाढ होणार?
बीअर ब्रॅण्ड Bira 91 चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर जैन यांनी सांगितले की, युक्रेन संकटामुळे बीअर व्यवसायावर परिणाम होणार आहे. बार्लीच्या किंमतीत युद्धामुळे वाढ झाली आहे. युक्रेन युद्धामुळे काही काळासाठी किमतीत वाढ होऊ शकते. बीअर कंपन्या तातडीने किमती वाढवणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मद्याच्या किमती काही प्रमाणात सरकार ठरवते. युद्ध अधिक काळ सुरू राहिल्यास बार्लीच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे बीअरच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
ऐन मोसमात बीअरची दरवाढ ?
एकूण बीअरच्या खपापैकी 40 ते 50 टक्के खप मार्च ते जुलै महिन्यात होतो. आर्थिक वर्ष 2023 मध्ये बीअरच्या विक्रीत 40 टक्क्यांनी वाढ होईल असा बीअर कंपन्यांचा अंदाज होता. कोरोना महासाथीमुळे असलेले निर्बंधाच्या परिणामी रेस्टोरंट्स, बार आणि क्लब बंद होते. देशात सर्वाधिक बीअर विक्री याच ठिकाणी होते.