महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की कधी लष्कराचा गणवेश घालून लढवय्यांचे मनोबल वाढवताना दिसतात, तर कधी टीव्ही स्क्रीनवर रशियाला आव्हान देताना दिसतात. सुपर पावर रशियन सैन्यासमोर गेल्या पाच दिवसांपासून मोर्चा सांभाळत असलेल्या जेलेंस्की यांचे आजोबा सिमॉन इवानोविच हे एकेकाळी रशियन रेड आर्मीचे लेफ्टनंट होते.जेलेंस्की यांचे आजोबा सिमॉन यांनी दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याला हैराण करुन सोडले होते. आज त्यांचा नातू जेलेंस्की रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा शत्रू आहे. चला तर पाहूया, हा जोश आणि धाडस कशा प्रकारे झेलेंस्की यांच्या नसानसात घुमत आहे.
झेलेंस्की यांना हे धैर्य आणि हिंमत आपले आजोबा सिमॉन यांच्याकडून मिळाले. याच रशियाने त्यांचे आजोबा सिमॉन यांच्या शौर्याचा गौरव करून त्यांना रणांगणाच्या मध्यभागी पदोन्नती दिली आणि थेट गार्डचे लेफ्टनंट बनवले. सिमॉन यांनी त्या काळातील सर्वात शक्तिशाली जर्मन सैन्याविरुद्ध 18 दिवस धैर्याने लढा दिला होता. यामुळेच युक्रेनच्या वॉर मेमोरियलमध्ये रेड आर्मीचा नायक म्हणून त्यांचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले गेले आहे.या धाडसाचा पुरावा देत, सिमॉन यांचे नातू वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अमेरिकेकडून सुरक्षेची ऑफर नकारली. त्यांना युक्रेनमधून दुसऱ्या देशात हलवण्याचा प्रस्ताव होता. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, मला दुसरीकडे हलवण्यापेक्षा आम्हाला शस्त्रास्त्र द्या. मी कुठेही पळून जाणार नाही. मी इथेच लढणार आहे.” असे झेलेंस्की म्हणाले.
असे रोल मॉडल बनले होत सिमॉन झेलेंस्की
1918 च्या सोवियत युनियनमध्ये, कामगार आणि शेतकऱ्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले होते. हे सैन्य दुसऱ्या महायुद्धात सोवियत रेड आर्मीच्या खांद्याला खांदा लावून लढले.
सिमॉन जेलेंस्की याच आर्मीच्या मोर्टार प्लॅटूनचे कमांडर होते. त्यांनी रेड आर्मीची सर्वात महत्त्वपूर्ण यूनिक 57 गार्ड्स रायफल डीव्हीजनची 174 वी रिजेमेंटला लीड केले होते. ते 23 जानेवारीपासून 9 फेब्रुवारी, 1944 पर्यंत युद्धाच्या मैदानात होते.त्यांच्या युनिटमध्ये जर्मनी सैन्याचे अनेक टँक आणि मिसाइल गनवर ताबा मिळवला होता.