पारा वाढणार ! यंदाच्या उन्हाळय़ात सरासरीपेक्षा अधिक तापमान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । यंदाच्या उन्हाळय़ाचे दीर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. यानुसार कोकण, घाट प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरींची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

कोकण व घाट प्रदेश या भागातील किमान तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ६५ ते ७५ टक्के आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ६५ टक्के आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा येथे तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे.

कमाल तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता कोकण, घाट आणि उत्तर महाराष्ट्रात ३५ ते ६५ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे. राज्याच्या एकूण वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरीसारख्या स्थितीची शक्यता नाकारता येणार नाही, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या पूर्वानुमानानुसार कोकण आणि घाट भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ही शक्यता उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात ही शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *