महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । आपल्या भाषणादरम्यान, जो बायडेन यांनी रशियावर आर्थिक निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यांनी पुतिन यांच्या युद्धाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्याचबरोबर त्यांनी युक्रेनबद्दल पूर्ण बांधिलकी व्यक्त केली आहे. बायडेन म्हणाले की, अनेक देश युक्रेनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. बायडेन यांच्या भाषणावेळी युक्रेनचे राजदूतही उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अमेरिका युक्रेनच्या पाठीशी आहे. रशियाविरुद्ध जो बायडन यांनी निर्बंध अधिक कडक केले आहेत. बायडन म्हणाले की, रशियन विमाने आमचे हवाई क्षेत्रातून उड्डाण घेणार नाहीत.
बायडेन म्हणाले की अमेरिका आणि नाटो युक्रेनला 1 अब्ज डॉलरची आर्थिक मदत देत आहेत. आमचे सैन्य युक्रेनमध्ये थेट हस्तक्षेप करणार नाही. याशिवाय आम्ही युक्रेनला सर्वतोपरी मदत करू. जेथे रशियाचा धोका आहे तेथे नाटोचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. पुतिन हे जगात एकाकी पडले आहेत.