विनोद कांबळीची दारुच्या नशेत कारला धडक, VIDEO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) हा क्रिकेटपेक्षा वादांमुळे जास्त लक्षात रहातो. कांबळीला रविवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. रविवारी दुपारी कांबळीने मुंबईतल्या त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला टक्कर मारली, याच आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याची जामिनावरही सुटका करण्यात आली. दरम्यान, विनोद कांबळीची त्या दिवसाची अवस्था दाखवणारा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. लाल रंगाचा टीशर्ट आणि हाफ पँट घातलेला विनोद या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे. विनोद दारूच्या नशेत असून तो त्या अवस्थेतच सोसायटीच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरील कारला धडकतो. विनोदला नीट चालताही येत नव्हते. त्यानंतर तो कारमालक आणि इतरांशी वाद घालतो.

विनोद कांबळीवर आयपीसीचं कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवणं), कलम 336 दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं आणि कलम 427 या कलमांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पीटीआयने याबाबतची माहिती दिली आहे.

गाडी धडकवल्याच्या प्रकारानंतर विनोद कांबळीने संकुलाचा वॉचमन आणि काही रहिवाशांबरोबर वाद घातला. त्याला आधी अटक करण्यात आली. नंतर जामिनावर त्याची सुटका झाली.

मागच्यावर्षी विनोद कांबळीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आपली सायबर फसवणूक झाल्याचा त्याने दावा केला होता. एएनआयच्या वृत्तानुसार, आरोपीने कांबळीची एक लाख रुपयांना फसवणूक केली होती. केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली आरोपीने कांबळीचे बँकेची माहिती मिळवली व त्याला फसवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *