संतापजनक ! नापाक सिंध प्रांतात हिंदूंना रेशन देण्यास नकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन : कराची: पाकिस्तानमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असतानात अल्पसंख्यांक समुदायांना भेदभावाची वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे. सिंध प्रातांत कराचीमध्ये हिंदूना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक मानवाधिकार व राजकीय कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पाकिस्तानमध्ये सिंध प्रातांत करोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. लॉकडाऊनमुळे स्थानिक रोजंदारीवर असणारे कामगारांना, नागरिकांना स्वयंसेवी संस्था, प्रशासनाच्यावतीने अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात यावे असे सिंध प्रांतीय सरकारने आदेश दिले आहेत. मात्र, सरकारच्या या आदेशाला हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून अल्पसंख्याक हिंदूना अन्नधान्य व इतर वस्तूंचे वाटप करण्यात येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मानवाधिकार व राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अय्यूब मिर्झा यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समुदाय सध्या भीषण खाद्यान्न संकटाचा सामना करत आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून कोणतीच मदत करण्यात येत नाही. हे अन्न धान्य फक्त मुस्लिमांसाठी असून हिंदूसाठी नसल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदूंना ल्यारी, सचर घोठ, कराची व इतर भागात भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे ही त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *