Russia-Ukraine War : युद्धाचे परिणाम आता घराघरात, तेलाच्या किमतींत 20 ते 25 रुपयांनी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । युक्रेन-रशियाच्या (ukraine-Russia War) युद्धाचे परिणाम आता घराघरात जाणवू लागलेत. स्वयंपाक घरातील तेलाच्या (kitchen oil) किमती 20 ते 25 रुपयांनी वाढल्यानं भाज्यांच्या फोडणीला भाववाढीचा तडका बसला असून किचन बजेट कोलमडू लागला आहे. युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास पुढील दीड ते दोन महिने लागतील असा अंदाज व्यक्त होतोय.

खाद्यतेल दरवाढीचा भडका
रशियाकडून सुरू असणाऱ्या बॉंम्ब वर्षावात युक्रेन होरपळून निघतोय. या दोन देशात सुरू असणाऱ्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगावर जाणवू लागलेत. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या नाशिकमध्ये खाद्य तेल दरवाढीचा भडका उडाला आहे. युक्रेनमधून मोठया प्रमाणात तेलाची आयात केली जाते. मात्र सध्या पुरवठा बंद झाल्यानं त्याचे थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होताना दिसत आहेत. एक लिटर तेलाचे भाव 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत, चार पाच दिवसात सोयाबीन, सुर्यफुल तेलाचे भाव 140 वरून 160 ते 165 रुपयांवर गेलंय. येत्या काळात 180 ते 190 रुपयांच्या दरवाढीची शक्यता आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता

येत्या काही दिवसात युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास त्यापुढे दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यातच देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं तेला बरोबरच इतरही वस्तूंच्या दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सरकार काय पावलं उचलणार? याकडं लक्ष लागलंय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *