कोरोनावर चीन करतंय कमाई, 3500 कोटींची खराब उपकरणे आणि मास्क केले निर्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन : बिजींग ; जगात कोरोना विषाणूंमुळे दहशत पसरली आहे. 180 देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाच्या चाचणी किट आणि मास्कची कमतरता सध्या सर्व देशांना भासत आहे. एकीकडे चीनमधून आलेल्या या विषाणून धुमशान घातले असताना, चीनमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. एवढेच नाही तर चीनने व्यापारासही सुरुवात केली आहे. नफा मिळवण्यासाठी चीन सध्या अनेक देशांना कोरोना चाचणी किट निर्यात करत आहे. मात्र ही चीनने निर्यात केलेली सर्व वैद्यकिय उपकरणे खराब असल्याचे समोर आले आहे. नेदरलँड आणि स्पेनमध्ये चीनने सदोष वैद्यकीय उपकरणे परत केली असल्याचे सांगितले जात आहे.

नेदरलँडने चीनकडून 6 लाख मास्क आयात केले होते. मात्र सर्व मास्क नेदरलॅंडने परत केले आहेत.चिनी वृत्तपत्र पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, नेदरलँडमधील चिनी दूतावासाने नेदरलँड सरकारकडे संपर्क साधून हे प्रकरण लवकरच सोडवण्यास सांगितले आहे. तर, स्पेननेही चिनी कंपनीला सदोष कोरोना व्हायरस टेस्ट किट परत केले आहेत. युरोपियन बाजारपेठेत चीन सध्या व्यापार करत आहे, यातून आपल्या नुकसानाची भरपाई करण्याचा चीनचा प्लॅन असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्पेनला चाचणी किट देणाऱ्या Shenzhen Bioeasy कंपनीने किट वापरायची कशी हे त्यांना माहित नसल्याची सबब दिली आहे. स्पॅनिश सरकारने असे म्हटले आहे की चाचणी किटमुळे चुकीचे निकाल येत आहेत. त्यामुळं या सर्व किट परत करणार आहेत.

3518 कोटींची वैद्यकिय उपकरणे चीनने विकली

यापूर्वी स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वाडोर इला म्हणाले की सुमारे 3518 कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे चीनकडून खरेदी करण्यात आली आहेत. यात 950 व्हेंटिलेटर, 5.5 लाख चाचणी किट, 10 लाख मास्क यांचा समावेश आहे. एकीकडे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना चीन मात्र याचा फायदा घेताना दिसत आहे. अमेरिका, ब्रिटन, स्पेन, इटलीसह अनेक देशांमध्ये भयंकर कोरोना विषाणूचा साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर देशांमध्येही हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *