महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ओळखली जाते. ही मालिका मागील १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. नेहमीच सोशल मीडियावर या मालिकेत एकमेव सेक्रेटरीची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर हे सक्रिय असतात. पण नुकताच मंदार चांदवडकर यांना एका पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण नुकतेच त्या ट्रोलिंगवर मंदार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
१ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त इन्स्टाग्रामवर मंदार चांदवडकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यांनी सर्व चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओत आत्माराम भिडे हे शिव महामृत्यूंजय मंत्राचे पठण करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी कपाळावर चंदनाचा टिळाही लावलेला दिसत आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना ‘ओम नमः शिवाय’ असे म्हटले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे एका युजरने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
https://www.instagram.com/realmandarchandwadkar/?utm_source=ig_embed&ig_rid=3d9dcd72-df98-4502-b66e-8b670575f42b
एका यूजरने त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटले की, भिडे भाऊ… कॅमेऱ्यासमोर नाही, तर देवासमोर बोला. यावर आत्माराम भिडे यांनी त्याला अत्यंत नम्रपणे उत्तर दिले. या ट्रोलरला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी देवासमोरच बोललो. तसेही आम्हा कलाकारांसाठी प्रेक्षक हे कोणत्याही देवापेक्षा कमी नाहीत.
सोशल मीडियावरील अनेकांवर ट्रोलला दिलेले हे उत्तर पाहून छाप पाडली आहे. विशेष म्हणजे ट्रोल करणाऱ्याने त्याच्या चुकीबद्दल अभिनेत्याची माफीही मागितली. आत्माराम भिडेंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर तो नेटकरी म्हणाला, सर, तुम्ही माझे मन जिंकले आहे. मी टीव्हीवर तारक मेहता पाहत होतो आणि त्याचवेळी इन्स्टाग्रामही चेक करत होतो. त्यावेळी तुमची पोस्ट पाहिली आणि त्यावर विनोद करण्याच्या मनःस्थितीत ती कमेंट केली होती. पण तुमचे हे उत्तर ऐकून माझा दिवस मस्त झाला.