महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमधील निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांपुढे मांडला.
महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, असा निर्णय आज एकमताने मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमधील निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. @ChhaganCBhujbal यांनी माध्यमांपुढे मांडला. #cabinetdecisions #OBCreservation pic.twitter.com/pAMo48kUli
— NCP (@NCPspeaks) March 3, 2022
हा निर्णय घेतल्यानंतर त्रूटी भरून काढण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे नेमके काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत, असेही छगन भुजबळ म्हणाले.