महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या ( indian students in kharkiv ) भारतीय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नवीन या कर्नाटकमधील २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आतापर्यंत भारतीय दूतावासाने भारतीयांना तात्काळ खारकीव्ह सोडण्याच्या सूचना दिल्यानंतर आहेत. यानंतर सुमारे १७०० भारतीय विद्यार्थी पायी रशियाच्या दिशेने निघाले आहेत, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.
युक्रेनमधून बाहेर पडणारे बहुतेक विद्यार्थी पोलंड आणि रोमानियाच्या सीमेकडे जात आहेत. तिथून भारत सरकार त्यांना ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बाहेर काढून मायदेशात नेत आहे. पण खारकीव्ह परिसरात अडकलेले भारतीय १२०० किलोमीटरहून अधिक अंतर कापून पोलंड किंवा रोमानिया सीमेवर जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे युक्रेनच्या नागरिकांना ट्रेनमध्ये प्राधान्य दिले जात आहे. यामुळे खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांसमोर फक्त रशियाच्या सीमेवर जाण्याचा मार्ग उरला आहे.
तिरंगा हाती घेऊन १७०० भारतीय विद्यार्थी निघाले
खारकीव्हमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले विद्यार्थी रशियाच्या दिशेने निघाले आहेत. सुमारे १७०० विद्यार्थी तिरंगा हाती घेऊन रशियन सीमेकडे कूच करत आहेत. या विद्यार्थ्यांनी आपले सामान रस्त्यावर टाकून दिले आहे. न खातापिता हे विद्यार्थी सुमारे ४० किलोमीटरचे अंतर चालत आहेत. युद्धात मृत्यू झालेल्या कर्नाटकातील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचे मित्र अमित आणि सुमन हे दोघेही यात आहेत. ते नवीन गावातीलच विद्यार्थी असून त्यांनी काल रात्री त्यांच्या कुटुंबीयांना फोनवर माहिती दिली. २० किमी चालल्यानंतर एका शाळेत आम्ही रात्री थांबलो होतो. आमच्याकडे खाण्यापिण्याचे सामानही उरलेले नाही. यामुळे आता २० किलोमीटर चालल्यानंतर सीमेपर्यंत पोहोचल्यावर रशियाच्या मदतीने त्यांना वाचवता येईल.