महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही वाढला असून मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,११० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१०० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६८० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)