महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । रंगांचे सण होळी आणि रंगपंचमी जवळ येत (Holi 2022) आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. प्रत्येकाचे चेहरे लाल, हिरवा, गुलाबी किंवा गुलालानं रंगवले जातात. रंग हे आनंद, नशीब आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातात. यंदा खेळण्यासाठी योग्य रंगांची निवड करून तुम्ही तुमचं नशीब उजळवू शकता. चला, जाणून घेऊ कोणत्या रंगांनी होळी-रंगपंचमी खेळल्यानं सुख आणि सौभाग्य (Happiness And Good Luck) वाढतं.
1. लाल रंग: लाल रंग किंवा गुलालानं होळी-रंगपंचमी खेळल्यानं आरोग्य आणि प्रतिष्ठा वाढते. लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. या रंगाच्या वापरानं मंगळ मजबूत होतो. मात्र, ज्या लोकांना लवकर राग येतो किंवा जे डिप्रेशनमध्ये असतात, अशा लोकांनी लाल रंगाचा वापर टाळावा. लाल रंग आग्नेय दिशेला सूचित करतो.
2. हिरवा रंग: हिरवा रंग लावून होळी-रंगपंचमी खेळल्यानं आनंद, समृद्धी, प्रेम, प्रगती आणि आरोग्यात वृद्धी होते. हिरवा रंग समृद्धी, प्रेम, प्रगती आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. हिरव्या रंगाच्या वापरानं बुध ग्रह मजबूत होतो. निर्णय क्षमता, बुद्धिमत्ता, विवेकबुद्धी वाढते. व्यवसायात प्रगती होते. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगानं होळी-रंगपंचमी खेळू शकता. हा रंग जीवनात शांती आणतो. हिरवा रंग उत्तर दिशेचे प्रतीक मानला जातो.
3. पिवळा रंग: पिवळ्या रंगानं होळी-रंगपंचमी खेळल्यानं प्रेम, सौंदर्य, आनंद वाढतो. भगवान श्रीकृष्णाला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग देखील गुरु ग्रहाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या वापरानं यश, कीर्ती आणि कीर्ती वाढते. एखाद्यासोबतच्या नात्यात कडवटपणा आला असेल तर, त्याच्यासोबत पिवळ्या रंगानं खेळा. त्यामुळं निराशा दूर होते. पिवळा रंग वायव्य (उत्तर-पूर्व) दिशा दर्शवतो.
4. गुलाबी रंग : या रंगानं होळी-रंगपंचमी खेळल्यानं प्रेम वाढतं. या रंगानं किंवा गुलालानं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत होळी-रंगपंचमी खेळावी. यामुळं तुमचं एकमेकांसोबतचं नातं आणखी घट्ट होईल. गुलाबी रंगाच्या वापरानं लढण्याची क्षमता वाढते.
5. निळा रंग : या रंगानं होळी-रंगपंचमी खेळल्यानं आरोग्य लाभतं. तुम्ही आजारी लोकांना निळा रंग लावू शकता. निळा रंग देखील शनिदेवाचं प्रतीक आहे. याच्या वापरानं शनिदेवाची कृपाही मिळू शकते. त्याचा वापर सुरक्षिततेची भावना मजबूत करतो.
( टीप : येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून घेतलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे.)