महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; बीजिंग – कोरोनाच्या आपत्तीत चीन व त्याच्या शेजारी देशात लष्करी तणाव वाढतो आहे. चीनने उत्तर-पूर्व भागात रणगाड्यांचा युद्धसराव केला. तर जपानने चीनलगत असलेल्या हिमयाकोझिमा बेटावर क्षेपणास्त्रे व ३४० सैनिक तैनात केले आहेत. चीनने फायटर जेट पाठवल्यानंतर तैवानने रणगाड्यांचा युद्ध सराव केला. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या आपत्तीचा फायदा घेत चीन आपल्यावर हल्ला करेल, अशी भिती तैवान व जपानला वाटते आहे.
चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने रविवारी चीन लष्कराने पिपल्स लिबरेशन आर्मीच्या ७८ व्या ग्रुप आर्मीने मुख्य रणगाड्यांचा रात्री युद्ध सराव केल्याचा दावा केला. हा युद्धसराव गेल्या १७ ते २३ मार्चदरम्यान करण्यात आला होता. परंतु छायाचित्रे आता जारी करण्यात आली आहेत. या छायाचित्रात चिनी रणगाडे रात्री आपले लक्ष्य उद्धवस्त करण्याचा सराव करण्यात येत आहे. चिनी लष्कराच्या रणगाड्यांचा ताफा नॉर्दन कमांडमध्ये येतो. तो जपान व तैवानलगतच्या भागाची सुरक्षा व्यवस्था पाहतो. चीननंतर २५ मार्च रोजी तैवाननेही युद्ध सराव केला. तैवानचे रणगाडे यिलान शहरातील रस्त्यावर दिसले. तैवान टुडेच्या वृत्तानुसार, रस्त्यावर रणगाडे फिरतानाचे दुर्मिळ दृश्य पाहण्यात आले. दरम्यान, जपानच्या लष्करानेही मियाकोझियामा बेटावर जमिनीवरून हवेत व समुद्रात युद्धनौका उद्धवस्त करणारी क्षेपणास्त्रे व ३४० सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. जेन्स डिफेन्स विकलीच्या वृत्तानुसार, वादग्रस्त चीन सागरात सेनकाकू व दिआओयू बेटाच्या समुहात चीनची आक्रमक भूमिका पाहून क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.