कोरोना संकट: शरद पवार म्हणतात आर्थिक संकट मोठं काटकसर करा, वायफळ खर्च टाळा,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; शरद पवारांनी फेसबुकवरून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना लोकांना जाणीव करून दिली आहे की राज्यावर आणि देशावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यासाठी सरकार योग्य वेळी पावलं उचलेल, पण लोकांनी आतापासूनच काटकसरीने वागायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हमधले महत्त्वाचे मुद्दे:
# हे खूप मोठं संकट आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सरकारी सूचनांचं तंतोतंत पालन करा.
# आजचा तातडीचा प्रश्न आरोग्याचा. 2-3 आठवड्यांनंतर आर्थिक प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल. उद्योगधंदे बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम.
# सगळ्यांना आर्थिक परिणाम भोगावे लागू शकतील. त्यासंबंधीचे निर्णय सरकार घेईल. लोकांनी काटकसर करावी. वायफळ खर्च थांबवावा.
# संकटकाळात दवाखाने बंद ठेवणं ही गंभीर बाब. ज्यांना वैद्यकीय ज्ञान आहे, त्या सर्वांनी (BAMS, BHMS) मदत करावी.
# ऊसतोड कामगारांची कारखान्यावरच सोय करण्यात यावी.
# राज्याला पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे.
# कुणी साठेबाजी करत असेल, तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागले. कठोर पावलं टाकली जातील. ही कमाईची संधी नाही. ही मदत करण्याची संधी आहे.
# राज्य सरकार, अधिकारी हे सांगतील तेच ऐका. व्हॉट्सअपवर गोष्टी पसरवू नका.
# खासगी फायनान्सवाले त्रास देत असतील तर शासनाला किंवा मला सांगा.
# शहरांतून गावांकडे जाणं टाळावं. गावकऱ्यांनाही भीती की शहरातून रोग येईल.
# केळी उत्पादकांना थोडं नुकसान सहन करावं लागू शकतं. सरकार त्यांना शक्य होईल ती मदत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *