महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; मुंबई : मुंबईतल्या मंत्रालयाच्या इमारतीत सोमवारी (30 मार्च) रात्री साडेआठ-नऊ वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. सात मजली मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. .मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाशेजारीच ही आग लागली होती.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला.
या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीय.