महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । रशिया आणि युक्रेन युद्धात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. यामुळे कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढ झाली आहे. आज बुधवारी सोन्याचा भाव ९०० रुपयांनी वाढला आणि तो ५५१३३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दोन आठवड्यात सोन्याचा भाव तब्बल ७००० रुपयांनी वाढला आहे. आॅगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६९१९ रुपये इतका होता. आता विक्रमी पातळीपासून सोनं अवघे १८०० रुपये दूर आहे.
आज बुधवारी बाजार खुला होताच सोने आणि चांदीमध्ये मोठी वाढ झाली. एमसीएक्सवर सध्या सोन्याचा भाव ५५१३३ रुपयांवर गेला असून त्यात ९०० रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये देखील १५०० रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ७२९८५ रुपये इतका वाढला आहे. दरम्यान, काल मंगळवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ५४५३३ रुपयांवर बंद झाला होता. कालच्या सत्रात त्यात १०१६ रुपयांची वाढ झाली होती. चांदीमध्ये देखील कालच्या सत्रात १७२१ रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव ७१६९० रुपयावर स्थिरावला होता.
आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली. स्पॉट गोल्डचा भाव २०२२ डॉलरपर्यंत गेला आहे. आज चांदीचा भाव २६.०९ डॉलर प्रती औंस इतका आहे.जाणकारांच्या मते सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्यामागे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध मुख्य करणार आहे. या युद्धाने जगभरात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. नुकताच कच्च्या तेलाचा भाव १४० डॉलर समीप पोहोचला होता. मागील १४ वर्षांतील हा उच्चांकी स्तर आहे. परिणामी जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव २०२२ डॉलरपर्यंत वाढला आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारीमुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये इतका वाढला आहे. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५३८९० रुपये इतका आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५३८९० रुपये इतका झाला. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०५६० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४७५० रुपये झाला. त्यात ५१० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३८९० रुपये इतका आहे.