महाराष्ट्र २४; ऑनलाईन :पुणे; जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, सार्स-कोव्ह-व्ही एका काचेच्या पृष्ठभागावर 96 तास म्हणजेच 4 दिवस राहू शकतो. तर हा व्हायरस प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टिलवर 72 तास राहू शकतो.स्मार्टफोन हे सर्वाधिक वापरले जाणार डिव्हाईस आहे. स्मार्टफोन दिवसभरात अनेक ठिकाणी स्पर्श होतो व शेकडो वेळा त्याला हात लागतो. यामुळे स्मार्टफोनवर व्हायरस राहण्याची शक्यता असते. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असून, या दरम्यान स्मार्टफोनवर कोरोना व्हायरस किती दिवस जिंवत राहू शकतो ? हा प्रश्न समोर आला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अभ्यासात देखील हीच माहिती समोर आली असून, यानुसार सध्याचा कोरोना व्हायरस स्टील आणि प्लास्टिकवर 72 तास जिंवत राहू शकतो. एका कार्डबोर्डवर हा व्हायरस 24 तास आणि कॉपरवर 4 तास असतो. कोरोना देखील सार्सप्रमाणेच ग्लासच्या पृष्ठभागावर 4 दिवस जिवित राहू शकतो.
यामुळे स्मार्टफोन फ्रंट ग्लास पॅनेलसोबत येतात. त्यामुळे यावर देखील व्हायरस 4 दिवस राहू शकतो, असे म्हणता येईल. केवळ स्मार्टफोनच नाहीतर स्मार्टवॉच, टॅबलेट आणि लॅपटॉपवर देखील हा व्हायरस जिवित राहू शकतो.
स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जात असल्याने व्हायरसपासून वाचण्यासाठी स्मार्टफोन सॅनिटायझ करणे आवश्यक आहे. यासाठी आयसोप्रोपिल अल्कोहॉल सॉल्यूशन वापरावे. 70 टक्क्यांपेक्षा अधिक सोल्यूशन असलेले आयसोप्रोपिल वापरू नये. तसेच यूजर्स क्लिनिंग लिक्विड आणि मायक्रोफायबर कापडचा देखील वापर करू शकता.