आज अर्थसंकल्प : पहा राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील निष्कर्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । कोविडच्या तीन लाटांमधून सावरत असतानाही राज्याच्या स्थूल उत्पन्न वाढीचा दर १२% गाठत या वर्षी राज्याचे स्थूल उत्पन्न २१,१८,३०९ कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याचे उत्पन्न, सार्वजनिक योजनांवरील खर्च, कृषी-उद्योग-सेवा क्षेत्रातील परिस्थिती आणि शिक्षण, आरोग्य या मानव विकास निर्देशांकाचे मोजमाप प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर एक दृष्टिक्षेप…

१. दरडोई उत्पन्नात वाढ
– राज्याचे दरडोई उत्पन्न १.९३.१२१ वरून २,२५,०७३ झाले आहे.
– यात देशात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर. हरियाणा, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक आघाडीवर.
– स्थूल उत्पन्न वाढीत देशाच्या (९%) सरासरीपेक्षा राज्याचे उत्पन्न (१२%) अधिक.

२. कृषी उत्पादनात घट
– ११८ टक्के अतिरिक्त पाऊस पडल्याने खरिपाच्या उत्पादनात घट दिसते.
– कापूस उत्पादनात ३०%, कडधान्यात २७%, तेलबियांत १३% घट अपेक्षित.
– सेंद्रिय शेती उत्पादनात (१.२६ लाख मे.टन) देशात दुसऱ्या क्रमांकवर.

३. गुंतवणूक १५ लाख काेटी
– १५,०९,८११ कोटींच्या गुंतवणुकीसह राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो.
– इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्रात ८,४२० कोटींच्या गुंतवणुकीसह ९५०० रोजगार निर्मितीचा दावा.
– उद्योग क्षेत्रात सरासरी ११.९ % वाढ अपेक्षित आहे. यात बांधकाम व सेवा क्षेत्र आघाडीवर.

४. पायाभूत सुविधा वाढल्या
– विजेचा वापर ०.६% घटला, गळती मात्र ३५ % वाढली.
– फक्त २७% विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्मार्टफोन उपलब्ध.
– ७१.७० लाख कोविड रुग्णांवर उपचार, इतर रुग्णांच्या संख्येत घट.
– मातृत्व अनुदान योजनांचे लाभार्थी व खर्च कमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *