महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) आज राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra budget 2022-23) करण्यात आला. इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पात काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण राज्य सरकार CNG वरचा टॅक्स 13.5 टक्यांवरुन ३ टक्यावर करणार आहे. यामुळे सीएनजीच्या किंमतीत नक्की घट होणार आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढीची चर्चा सुरु असताना राज्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
इतर महत्त्वाच्या घोषणा
# मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
# हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.
# तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
# आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद.
# अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार.
# एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत
# महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केली आहे.
# कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार.