महागाईचा हाहाकार ! श्रीलंकेत एक पॅकेट ब्रेड घेणंही परवडेना, परिस्थिती भीषण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । श्रीलंकेत महागाईचा आगडोंब पाहायला आहे. तेथील लोकांसाठी सोन्यापेक्षा दूध घेणं अधिक कठीण झालं आहे. 54 वर्षीय शामला लक्ष्मण दूधाच्या शोधात राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर रात्रभर भटकत होत्या. सात जणांच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांना दूध हवं होतं. पण खूप शोधूनही ते मिळालं नाही. द गार्डियनशी संवाद साधताना आजकाल कोणत्याही दुकानात दूध मिळणं अशक्य झालं आहे आणि जरी तुम्हाला कोणत्याही दुकानात ते दिसलं तरी ते इतकं महाग असतं की खरेदी करूच शकत नाही. यामुळे दूध विकत घेणं शक्य नाही असं म्हटलं आहे

जीवनावश्यक सर्वच सामान हे अत्यंत महाग झालं आहे. जर या किमती अशाच राहिल्या तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार याची आता मला खूप भीती वाटू लागली आहे असं देखील शामला यांनी म्हटलं आहे. श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि इंधनासहित अनेक गोष्टी श्रीलंका परदेशातून आयात करू शत नाही. श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.क ज्यामुळे एक हजार बेकऱ्या या बंद पडल्य़ा आहेत. आठवडाभरपूर्वी इंडस्ट्री असोसिएशनने याबाबत माहिती दिली होती.

देशामध्ये इंधनाची कमतरता असल्याने काही ठिकाणी विजेवर चालणारी यंत्रणा बंद करावी लागली आहे. दिवसभरात तब्बल सात तास वीजपुरवठा हा खंडीत केला जातो. एन. के सीलोन बेकरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष जयवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शहरी भागांमध्ये गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट झाल्या आहे. ब्रेडसाठी जवळपास 150 श्रीलंकाई रुपये (0.75 डॉलर) मोजावे लागत आहे. जर एक आठवडा अशीच परिस्थिती राहिली तर 90 टक्के बेकऱ्या बंद कराव्या लागतील. सरकारने तातडीने यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे.

गॅसच्या तुटवड्याचा परिणाम हा अनेक छोट्या रेस्टॉरंट्सवर होत आहे. पण सर्वसामान्य माणसांवर देखील गंभीर परिणाम होत आहे. श्रीलंकेतील या भीषण परिस्थितीचा फटका हा फक्त गरिबांनाच बसत नाही. तर चांगलं उत्पन्न असणाऱ्या नोकरदारवर्गाला देखील बसत आहे. आपल्या गरजा पूर्ण करणं देखील अत्यंत अवघड झालं आहे. भाज्याच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्या भाज्या देखील खरेदी करू शकत नाहीत. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी एक इंजिनियर तरूण नोकरी करून ऑटो देखील चालवत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *