महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन ढाले. पिंजरा या सिनेमातील त्यांची खलनायिकेची भूमिका गाजली होती. वत्सला यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष मुख्य अभिनेत्री तसेच सहायय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका केल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई.
वत्सला यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून केली. ‘फायर’, ‘नागपंचमी’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ असे अनेक चित्रपट गाजले होते. पण ‘सुहाग’ या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.