अवकाळी पावसाने नुकसान : तब्बल दोन हजार क्विंटल द्राक्षे मातीमोल, तडे गेल्याने दर घसरण्याची चिन्हे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव, निगडोळ आणि निळवंडी तर निफाड तालुक्यातील कोळगाव येथे द्राक्षबागाच कोसळल्यानेे दीड ते दोन हजार क्विंटल द्राक्ष मातीमोल झाले आहेत. द्राक्षांना तडे जात असल्याने दरावर परिणाम होऊन ते १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होण्याची चिन्हे आहेत. सध्या चांगल्या प्रतीची द्राक्ष ३० ते ४० रुपये किलो आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणार आहे. राज्यात हा आठवडा अवकाळी पाऊस आणि गारपिटीची गेल्याने द्राक्ष, कांदा, गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी चारनंतर सिन्नर, निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. जिल्ह्यात अद्यापही ४० ते ५० टक्के द्राक्षबागा काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत.

असे आहेत दर ४५ ते ६० (निर्यातक्षम), १५ ते ३० (लोकल), १२ ते १५ (बेदाण्यासाठी) सोनाका ४५ ते ६० (निर्यातक्षम), ३० ते ४० (लोकल) १२ ते १५ (बेदाण्यासाठी) आकडे प्रतिकिलो रुपयांत

रशिया- युक्रेन युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम सुरू असतानाच राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकरी अडचणीत सापडला. पावसामुळे द्राक्षांचे दर अजून कोसळण्याची शक्यता असल्याचे द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी म्हटले.

बेदाणा उत्पादकांकडे शेतकऱ्यांची धाव निगडोळला अवकाळी पावसाने द्राक्षघडांना गेलेले तडे. नुकसान झालेल्या द्राक्षांपासून आता बेदाण्याचे उत्पादन येत्या काही दिवसांत नुकसान कळणार

पावसाने भिजलेल्या द्राक्ष घडांना देठाजवळ तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अद्याप घडावर पाणी असून उष्णता वाढल्यानंतर तडे जाण्याचे प्रमाण वाढते. अजून ४ ते ५ दिवसांनी खरे नुकसान समोर येईल, असे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक रमेश खापरे यांनी सांगितले.

नुकसानीमुळे शेतकऱ्यांना बेदाणा उत्पादकांकडे धाव घ्यावी लागत असून दराबाबत चौकशी वाढली आहे. बेदाणा उत्पादन वाढले तर बेदाणा दरावर परिणाम होईल.

ऊन वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
उष्णता वाढल्यानंतर द्राक्षांत गोडवा उतरून ग्राहकांकडून मागणी वाढते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक सध्या उन्हाची तीव्रता वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कोलकाता, मध्य प्रदेशमधून द्राक्षांना मागणी असते. जेव्हा ही मागणी वाढेल तेव्हा द्राक्ष दर स्थिर होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *