महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । कायम हिंदू धर्माबद्दल पाश्चिमात्य देशातील लोकांना आपुलकी राहिली आहे. त्यांना हिंदू धर्मातील चालीरिती आणि प्रथा याबाबत कायम कुतुहूल असते. मग तो कुंभमेळा असो की इतर धार्मिक उत्सव असो. अशी दृश्य परदेशी पर्यटक कायम आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना आपल्याला दिसतात. हिंदू धर्माबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यालाही आपुलकी राहिली आहे.
१३ वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी सतत भारतात स्टीव्ह वॉ ये-जा करत असतो. २००९ मध्ये स्थापन केलेल्या स्टीव्ह वॉ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग असतो. पण स्टीव्ह वॉ यांची यावेळी भारत भेट वेगळ्या कारणासाठी होती. त्याने आपल्या जवळच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाराणसी गाठले. मृत्यूनंतर त्याच्या अस्थिंचे विसर्जन गंगा नदीत केले.
माझ्या हातून पुण्यकर्म घडावे अशी त्याची इच्छा होती आणि त्याचबरोबर वाराणसीला भेट द्यायची होती. यात खूप आध्यात्मिक भावना आहे. माझ्या हातून ब्रायनच्या अस्थि विसर्जन करण्याचे पुण्यकर्म घडले. याचे मला मनापासून समाधान वाटत आहे. त्याचे जीवन खूप खडतर होते आणि त्याला कुटुंब नव्हते. त्याची शेवटची इच्छा गंगेत अस्थिविसर्जन करावे ही होती. त्याच्यासाठी काहीतरी केल्याबद्दल मला खूप समाधान वाटत असल्याचे स्टीव्ह वॉने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.