फडणवीस यांच्या व्हिडिओ बॉम्बल गृहमंत्री आज देणार उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या आरोपांना आज महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) विधानसभेत लक्षवेधी झाल्यानंतर बोलणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता दिलीप वळसे-पाटील विधानसभेत फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देतील.

आपल्या उत्तरात काय असणार हे संध्याकाळीच कळेल असं दिलीप-वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्याकडे किती बॉम्ब आहेत, ते कधी आणि कसे फुटणार हे त्यांनाच माहिती असेल, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. माझ्या उत्तरानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल. करारा जवाब मिलेगा, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे दिलीप वळसे-पाटील सभागृहात काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, आज विधानसभेचं कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सभागृहात रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अनिल परब, एकनाथ शिंदे उपस्थोत होते. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजप आक्रमक होणार असून त्याला उत्तर देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *