तारीख ठरली…! ७५ दिवसानंतर ‘सरसेनापती हंबीरराव’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतंच त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतंच प्रविण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/pravinvitthaltarde/?utm_source=ig_embed&ig_rid=29ef3307-68dc-46b0-992f-f8b601e9e7fa

प्रविण तरडेंनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रविण तरडे एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट, असे या पोस्टरवर लिहिले आहे. प्रविण तरडेंनी त्याला हटके कॅप्शन दिले आहे.

“आता आपण फक्त दिवस मोजायचे.. ७५ राहिले!” असे म्हणतं प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसेनापती हंबीरराव हा २७ मे २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *