महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यंगामुळे येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक असणारी उपयुक्त साधन घेणेसाठीच्या अर्थसहाय्य योजने अंतर्गत असणाऱ्या साधनांमध्ये सीएनजी किट चा समावेश करून घ्यावा कारण सध्याचे वाढते पेट्रोलचे दर पाहता सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रवासखर्चावर प्रचंड ताण येत आहे पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी चा खर्च निम्म्यापेक्षा कमी आहे.दिव्यांगांच्या शारीरिक मर्यादा विचारात घेता त्यांना गाडीशिवाय कोठेही जाता येत नाही त्यामुळे दिव्यांगांच्या गाड्यांना सीएनजी किट बसविल्यास त्यांचा पेट्रोलचा खर्च कमी होऊन त्यांची आर्थिक बचत होईल. तसेच यामुळे पर्यावरणालाही फायदा होईल. तरी याविषयी योग्य त्या सुधारणा करुन सहकार्य करावे.
हे निवेदन पालिकेचे आयुक्त साहेब, महापौर मा. माई ढोरे यांना राष्ट्रवादी अपंग सेलचे तर्फे देण्यात आले यांनी दिले यावेळी अध्यक्ष अशोक कुंभार, उपाध्यक्ष आनंद बनसोडे, विजय शिंगे, हरिदास शिंदे, बाळासाहेब तरस, महेश् वाघ, अशोक सोनावणे, रवी भिसे, मोहम्मदशफी पटेल, हरी गाडेकर, सुधाकर कांबळे उपस्थित होते.