पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त Flex Fuel लवकरच बाजारात येणारं ; नितीन गडकरींचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । गेल्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलवरच्या (Petrol – Diesel) वाहनांमुळे होणारं प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी आणि या इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाच्या वापरावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicles) भर दिला जात आहे. त्याच वेळी अन्य पर्यायी इंधन शोधण्यावरही भर दिला जात आहे. यातूनच पर्यायी इंधन म्हणून सध्या फ्लेक्स-फ्युएलचा (Flex Fuel) जोरदार विचार होत आहे. फ्लेक्स फ्युएलवरच्या वाहनांबाबत एक योजना आखण्यात येत असून, अनेक नामवंत वाहन उत्पादक कंपन्यांनी येत्या सहा महिन्यांत फ्लेक्स-फ्युएलवर चालणारी वाहनं तयार करण्याचे आश्वासन दिलं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 12 मार्चला ‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ कार्यक्रमात सांगितलं.

फ्लेक्स-इंधन हा पेट्रोल-डिझेलला एक प्रकारचा पर्याय आहे. म्हणूनच त्याला पर्यायी इंधन असंही म्हणतात. फ्लेक्स हा इंग्रजी शब्द फ्लेक्झिबलपासून (flexible) आला आहे. हे गॅसोलीन आणि मिथेनॉल (methanol) किंवा इथेनॉलच्या (Ethanol) मिश्रणापासून तयार केलं जातं. फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स इंजिन (Flex Engine) निर्माण करणं आवश्यक आहे.

फ्लेक्स इंजिन इतर इंधनांवरही चालू शकतं. जगाच्या अनेक भागांत फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहनं बनवली आणि चालवली जातात. फ्लेक्स इंधन वापरणारा ब्राझील (Brazil) हा सर्वांत मोठा देश आहे. भारतात अद्याप फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या इंजिन्सचं उत्पादन सुरू झालेलं नाही; मात्र येत्या सहा महिन्यांत अशी वाहनं तयार केली जातील, असं आश्वासन वाहन कंपन्यांनी दिल्याचं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केलं.
पुण्याला जाणारी चालती शिवशाही अचानक पेटली; 40 प्रवाशी, अंगावर काटा आणणारा Video

आपल्या देशात 80 टक्के पेट्रोल आणि डिझेल आयात (Import) केलं जातं. फ्लेक्स इंधन सुरू केल्यानं हे अवलंबित्व कमी होईल. इथेनॉल, मिथेनॉल हे जैव-उत्पादन (Bio-Products) असून, ते ऊस, मका आणि इतर कृषी कचऱ्यापासून तयार केलं जातं. त्यामुळे त्याची किंमतदेखील कमी असते. आपल्या देशात ऊस आणि मक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या इंधनाचं उत्पादन वाढू शकतं. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारू शकते.

फ्लेक्स इंजिनच्या आगमनाने वाहने पूर्णपणे पेट्रोल किंवा डिझेल किंवा इथेनॉलवर धावू शकतील. तसंच या इंधनापासून होणारं प्रदूषणही कमी असतं. आपल्या देशात प्रदूषण ही मोठी समस्या असून, त्यामध्ये वाहनांमधून निघणारा धूर हे मोठं कारण आहे. पेट्रोलियम इंधन पर्यावरणासाठी चांगलं नाही. फ्लेक्स इंधनावर भर दिल्यास कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) कमी होईल. त्यामुळे पर्यावरणाला फारच कमी हानी पोहोचते. या सगळ्या बाबींचा विचार करून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी फ्लेक्स इंधनाबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून, या इंधनाची निर्मिती आणि हे इंधन वापरून चालवली जाणारी वाहनं यांच्या निर्मितीबाबत तपशीलवार नियोजन केलं जात असल्याचं नितीन गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *