मुंबईत पारा 40 शी पार ; पुढचे 3 दिवस अतिशय महत्वाचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ मार्च । weather department has issued a heat wave warning : मुंबईत पाऱ्याने जवळपास 40शी गाठली आहे. अशातच हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पुढचे तीन दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कडक ऊन बाहेर असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना सावधान राहा आणि काळजी घ्या. (IMD issues heat wave warning for Mumbai, Thane for next 3 days)

यंदा मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणे कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यातच हवामान विभागाने मुंबई, ठाणे कोकणासाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. (weather department has issued a heat wave warning in Mumbai) पुढचे तीन दिवस उष्णतेची कडक लाट असेल. त्यामुळे उष्माघातासह अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. उन्हाळ्याने वर्दी दिली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. उष्माघात हा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रासतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *