काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनले पाहिजेत- नरेंद्र मोदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ मार्च । ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाचं सर्वजण कौतुक करत आहेत. पीएम मोदींनी नुकतीच चित्रपटाच्या टीमचीही भेट घेतली होती. आता मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, चित्रपटात जे दाखवलं ते दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सत्य दडपण्याचा प्रयत्न केला

या चित्रपटातून सत्य समोर आलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, त्यांनी असेही सांगितलं की एक संपूर्ण यंत्रणा सत्य दडपण्यासाठी काम करत आहे. सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत.

तुम्हाला सांगतो, ‘द काश्मीर फाइल्स’ कमाईच्या बाबतीतही कमाल करत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या सिनेमाच्या कथेत खूप ताकद आहे. या चित्रपटात ९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या निर्वासीत होण्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सर्वाथाने प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना विचार करायला लावणारा आहे. सुरुवातीला हा सिनेमा फक्त ७५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीनंतर हा चित्रपट देशभरात २ हजारांहून जास्त स्क्रीन्सवर दाखवला जात आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि लिहिले की, ‘मी अभिषेक अग्रवालचा आभारी आहे. तुम्ही भारतातलं सर्वात आव्हानात्मक सत्य दाखवण्याचं धाडस केलं आणि या सिनेमाची निर्मिती केली. #TheKashmirFiles चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित होत आहे. जागतिक स्तरावर मोदींचं नेतृत्तव किती शक्तीशाली आहे हे दाखवतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *