उन्हाळा ; वाढत्या तापमानात स्वतःची काळजी कशी घ्याल ? ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । येत्या दोन दिवसांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी जाणीवपूर्वक काही बाबींचे पालन करण्याचा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे. तापमान वाढल्यामुळे थकवा येऊ शकतो. एखाद्या व्यक्‍तीच्या शरीराचे तापमान वेगाने वाढल्यास उष्माघाताचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय खबरदारी घेण्याचे निर्देश या तज्ज्ञांनी दिले आहेत.

मळमळ, मानसिक स्थितीमध्‍ये बदल, घाम येण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल, श्‍वासोच्‍छ्वास जलद होणे आणि तीव्र डोकेदुखी आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. उपचार न केल्‍यास उष्‍माघाताचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड व स्‍नायूंवर परिणाम होऊ शकतो. उपचाराला अधिक विलंब केल्‍यास परिणाम अधिक गंभीर होऊन गंभीर आजार किंवा मृत्‍यू होण्‍याचा धोका वाढतो. त्यामुळे उष्‍माघाताची लक्षणे दिसून येताच त्‍वरित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. विशेषत: एका तासामध्‍ये स्थितीत सुधारणा न झाल्यास त्‍वरित उपचार घ्‍यावा, असे चीफ इंटेन्सिविस्‍ट संदीप पाटील यांनी सांगितले.

…ही काळजी घ्या

– दुपारी १२ ते ३ यादरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा.

– तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्या.

– हलक्या रंगाचे सैल-सुती कपडे घाला.

– उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री ,टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.

-प्रवासात पाणी सोबत ठेवा.

-दारु, कॉफी, चहा कार्बोनेटेड शीतपेये टाळा, त्यामुळे शरिरातील पाणी कमी होते.

 

-शिळे अन्न खाऊ नका

·-पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना ठेवू नका.

-थकवा वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

-ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेये प्या.

-प्राण्यांना सावलीत ठेवा, त्यांना भरपूर पाणी द्या.

-घर थंड हवेशीर ठेवा, घरात खेळती हवा राहू द्यावी.

-बाधित झालेल्या रुग्णांची काळजी

-शरीरामध्ये द्रवपदार्थाचे प्रमाण संतुलित राहील, याची काळजी घ्या

-त्रास होत असल्यास रुग्णाला आरोग्य केंद्रात न्या.

-उष्माघात त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *