Electric Scooters घेण्याचा विचार करताय ? या BEST इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या फीचर आणि किंमतीविषयी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । पेट्रोलच्या वाढत्या किमती (Petrol-Diesel prices), पर्यावरणाविषयी (Environmental awareness) वाढलेली जागरूकता, यामुळे आता लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicles) वळू लागले आहेत. सध्या देशात अनेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric scooters) लॉंच केल्या आहेत. त्यातही एथर एनर्जी, बजाज आणि टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक स्कूटरला बाजारात चांगली मागणी आहे. तुम्हालाही या तीन कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक खरेदी करायची आहे? तर जाणून घ्या एथर 450 एक्स (Ather 450X) , बजाज चेतक (Bajaj Chetak) आणि टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) या तीन इलेक्ट्रिक स्कूटरबाबत

इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. यासाठी फेम-2 सबसिडी अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे कल वाढतोय. जर तुम्हीदेखील इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला Ather, Chetak, iQube सारख्या सर्वोत्तम स्कूटर्सची माहिती देत आहोत. त्या आधारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इलेक्ट्रिक स्कूटर निवडू शकता.

जानेवारी 2022 मधील इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीचे आकडे पाहिल्यास यामध्ये Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरने बाजी मारली आहे. जानेवारी महिन्यात या स्कूटरच्या 2,825 युनिट्सची, TVS iQube च्या 1,529 युनिट्सची तर Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटरची 1,268 युनिट्स विकली गेली आहेत. जनसत्तानेयाविषयी वृत्त दिले आहे.

किंमतीचा विचार केल्यास, Ather 450X च्या किमतीची सुरुवात 1.18 लाख रुपयांपासून होते. तर यामधील टॉप व्हेरियंटची किंमत 1.38 लाख रुपयांपर्यंत आहे. परंतु केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर दिलेली फेम-2 सबसिडी मिळाल्यास या स्कूटरची किंमत खूपच कमी होते. TVS iQube स्कूटर एकाच व्हेरियंटमध्ये येते. तिची किंमत 1.15 लाख रुपये आहे. Bajaj Chetak दोन व्हेरियंटमध्ये येते. त्यातील अर्बनची किंमत 1 लाख रुपये आणि प्रीमियम व्हेरियंटची किंमत 1.15 लाख रुपये आहे.

टायर्स आणि ब्रेक्स

Ather 450X स्कूटरमध्ये कंपनीने पुढील आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. TVS iQube चे पुढचे टायर 90/90-12 आणि मागचे टायर 90/90-12 चे आहे. यात ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील सारखी वैशिष्ट्येदेखील आहेत. Bajaj Chetak स्कूटरचे पुढचे टायर 90/90-12 आणि मागील टायर 90/100-12 आहे. हे टायर ट्यूबलेस असून त्याला अलॉय व्हील मिळतात.

काय आहेत फीचर्स?

Ather 450X स्कूटरच्या स्पीडबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 3.3 सेकंदांच्या वेळेत 0 ते 40 kmph चा टॉप स्पीड गाठू शकते. यात 7 इंचांचा फुल डिजिटल टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो 1.3 GHz पॉवरच्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने ऑपरेट होतो. तसंच तो कंपनीने अँड्रॉइड ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टमवर तयार केला आहे. या स्कूटरमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. जिओ-फेन्सिंग आणि जिओ टॅगिंगसारखी फीचर्स Ather 450X व iQube दोन्ही स्कूटरमध्ये उपलब्ध आहेत. तर, iQube वरील हेडलॅम्प पुढील अ‍ॅप्रनमध्ये लावला आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये एलईडी डेटाइम रनिंग लाइट मिळतात. Bajaj Chetak इलेक्ट्रिक रेट्रो स्टायलिंगसह येते. यात राउंड हेडलॅम्प आणि एलइडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत, जे क्रोम बेझल्ससह येतात.

 

बॅटरी चार्ज करण्यासाठी किती तास लागतात?

Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.9 kwh चा लिथियम ऑयन बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 116 किलोमीटर चालते. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 3.35 तास लागतात. TVS iQube स्कूटर एका चार्जमध्ये 75 किलोमीटर चालते. ही स्कूटर 4.2 सेकंदात 0 ते 40 kmph ची स्पीड घेऊ शकते. स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रतितास आहे. बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी 5 तास लागतात. Bajaj Chetak एका चार्जमध्ये 90 किलोमीटर पर्यंत जाते. तर, Bajaj Chetak इको मोडमध्ये 60 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. चार्ज करण्यासाठी 5 तास लागतात.

तुम्ही जर या तिन्हीपैकी एक इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती निवडू शकता. अर्थात या तिन्ही स्कूटरला मागणी चांगलीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *